Join us

अनुष्का शर्मा पेमेंटच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 17, 2015 04:47 IST

‘बॉ म्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्काने एकदम हटके अभिनय केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीही अनुष्काला अद्याप चित्रपटासाठीचे पेमेंट मिळालेले नाही.

‘बॉ म्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्काने एकदम हटके अभिनय केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीही अनुष्काला अद्याप चित्रपटासाठीचे पेमेंट मिळालेले नाही. मेगाबजेट म्हणवला जाणारा हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स आॅफिसवर चित्रपट फ्लॉप झाला आणि निर्मात्यांचे खूप नुकसान झाले. ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा दोघेही मुख्य भूमिकेत होते. रणबीरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसकडून पेमेंट काढून घेतले आहे. मात्र, अनुष्का अजूनही या रकमेची वाट पाहत आहे. तिने चित्रपटाच्या निर्मात्यांशी बातचित केली असता तिला योग्य उत्तर मिळाले नाही. अनुष्का कधीही पेमेंटची याचना सार्वजनिक पातळीवर करत नाही; पण तरीही तिचे एक कोटी रुपये शिल्लक असल्याचे तिने सांगितले आहे.