Join us  

RCB च्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला केला व्हिडिओ कॉल, किंग कोहलीचा क्युट Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 8:49 AM

विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला.

सध्या सगळीकडे आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. काल झालेल्या रॉय चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबने (KIIP) सामन्यात किंग कोहलीचा संघ जिंकला. विराट कोहलीने (Virat Kohli)  कमालीची खेळी करत ४९ चेंडूत ७७ धावा केल्या. सामना जिंकल्यानंतर काही वेळाने विराट व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला. पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि वामिका, अकाय या दोन्ही मुलांसह त्याने व्हिडिओ कॉलवरुनच आपला आनंद शेअर केला.

अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'अकाय' ठेवण्यात आलं. लेकाच्या जन्माच्या आधीपासूनच कोहली कुटुंब लंडनमध्येच होतं. आयपीएलसाठी विराट काही दिवसांपूर्वीच भारतात परतला. तर अनुष्का दोन्ही मुलांसह अद्यापही लंडनमध्येच आहे. आायपीएलच्या या सिझनमध्ये विराटच्या रॉय चॅलेंजर्स बंगळुरुने पहिलीच मॅच गमावली होती. मात्र काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरुने शानदार खेळी करत सामना जिंकला. याचा आनंद साजरा करताना विराट आणि अनुष्काने व्हिडिओ कॉल केला. यावेळी लहान बाळासोबत ज्याप्रकारे आपण बोलतो तशा पद्धतीने विराट बोलत होता. तो अकाय आणि वामिकाशीच बोलत असणार असाच अंदाज चाहत्यांनी वर्तवला. विराटचं कुटुंब लंडनला असलं तरी त्याच्या आनंदात पत्नी आणि मुलं अशा पद्धतीने सहभागी झाले. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला.

विराटच्या या क्युट हावभावाने चाहत्यांचं मन जिंकलं. तसंच त्याचा जबरदस्त फॉर्म बघूनही प्रेक्षक खूश झाले. '... आणि या व्यक्तीला तुम्ही T20 मधून बाहेर ठेवता' अशी खोचक कमेंटही एकाने केली. यावर्षी तरी बंगळुरु संघाने ट्रॉफी जिंकवावी अशी फॅन्स आशा करत आहेत. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीआयपीएल २०२४सोशल मीडिया