केवळ नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारा अनुराग शर्मा आता बऱ्याच दिवसांनंतर सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. कटकारस्थानानंतर आता जरा सोज्वळ प्रकारातली भूमिका ‘इतना करो ना मुझे प्यार’मध्ये तो करणार आहे. या सीरिअलमधील राम कपूरची भूमिका करताना अनुराग दिसणार आहे. ही भूमिका सकारात्मक असून, मालिकेत वेगळे मजेशीर टिष्ट्वस्ट घेऊन येणार आहे.