Join us

'कृष्णा चली लंदन'मध्ये अनुपम श्याम बनणार गायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:21 IST

अभिनेता अनुपम श्याम हे स्टारप्लसवरील मालिका 'कृष्णा चली लंदन'मध्ये बडे पापांची भूमिका साकारत आहेत.

अभिनेता अनुपम श्याम हे स्टार प्लसवरील मालिका 'कृष्णा चली लंदन'मध्ये बडे पापांची भूमिका साकारत असून आपल्या कटकारस्थानांनी ते शुक्ला परिवारात वादळ निर्माण करत आहेत. अशा प्रकारची भूमिका अनुपम यांनी आधी कधीही केली नसल्यामुळे ह्या भूमिकेसाठी त्यांना मोठी तयारी करावी लागत आहे.बडे पापांची अशीच एक खासियत आहे की ते शुक्लाईन (माधुरी संजीव) ला संवादांपेक्षा बॉलीवूड गीतांसह चिडवतात. ते म्हणाले, “बडे पापा ह्या भूमिकेची ही खासियत मला अतिशय आवडली. शुक्लाईनला चिडवण्यासाठी त्यामुळे मला काही बॉलीवूड गीते शिकावी लागली. काही गाणी तर मी स्वतःच आयत्या वेळी सुचवली आहेत. बडे पापा ही भूमिका साकारताना मला खूप मजा येत आहे.”त्यांचा हा खास परफॉर्मन्स प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहायला आवडतो अशी अनुपम श्याम यांना आशा असून मालिकेत आता अनेक गुपिते आणि रहस्ये निर्माण होणार आहेत, ज्यामुळे ही मालिका पाहणे खूपच रोचक ठरेल. 'कृष्णा चली लंडन' २१ वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे.त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो. कृष्णा मात्र महत्त्वाकांक्षी असते आणि तिला सारे जग पाहायचे असते. 

टॅग्स :स्टार प्लस