Join us

अनुपम खेर भेटले सोनाली बेंद्रेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 19:14 IST

अनुपम खेर त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणाठी न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. चित्रीकरणातून जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी ते आवर्जून सोनालीची भेट घेतात.

ठळक मुद्देफावल्या वेळात अनुपम खेर घेतात सोनालीची भेट

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. अनुपम खेर यांनी नुकतीच तिची भेट घेतली आहे. अनुपम खेर त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणाठी न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. चित्रीकरणातून जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी ते आवर्जून सोनालीची भेट घेतात. ‘सोनाली सध्या उपचार घेत आहे तिने लवकरात लवकर बरे होऊन घरी परतावे एवढेच मला वाटते. ती एक धाडसी व्यक्तीमत्त्व असलेली महिला आहे. ती मोठ्या धाडसाने सर्व परिस्थितीला सामोरी जात आहे. तिला आजाराशी लढण्याकरता आणखी बळ मिळावे अशी प्रार्थना मी देवाकडे नेहमीच करतो’ असे अनुपम खेर म्हणाले.

एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी काही महिने ते न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यामुळे फावल्या वेळात ते सोनालीची भेट घेतात आणि तिच्यासोबत वेळ व्यतित करण्याचा प्रयत्न करतात. याआधी ते ऑगस्टमध्ये सोनालीला भेटायला गेले होते. या भेटीनंतर त्यांनी सोनालीला माझी हिरो असे सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटरवर सोनालीला भेटल्याचे सांगितले होते.त्यावेळी अनुपम खेर यांनी ट्विट केले होते की, मी सोनाली बेंद्रेसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. आम्ही मुंबईत बऱ्याचदा भेटलो आहे. नेहमी उत्साही असणाऱ्या व्यक्तींपैकी ती एक आहे. गेल्या पंधरा दिवसात मला न्यूयॉर्कमध्ये तिच्यासोबत स्पेशल वेळ व्यतित करण्याची संधी मिळाली. मी सहजतेने म्हणू शकतो की, ती माझी हिरो आहे.  जुलै महिन्यात सोनालीला हाय- ग्रेड कॅन्सरचे निदान झाले. तिने स्वत: ट्विट करत याबद्दल माहिती दिली. अनुपम खेर यांच्या आधी अक्षय कुमार, हृतिक रोशन, सुझान खान यांनी देखील तिची न्यूयॉर्कमध्ये जाऊन भेट घेतली होती.

टॅग्स :अनुपम खेरसोनाली बेंद्रे