लवकरच आणखी एक स्टारपुत्र बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे; पण तो अभिनेता म्हणून नव्हे, तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांचा मुलगा अजान खान बँकस्टर नावाच्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. एक बँक लुटण्याची योजना बनवणाऱ्या तीन तरुणांची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या बातमीला अजाननेही दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, ‘मी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. सुरुवातीला मी दुसऱ्या चित्रपटातून पदार्पण करणार होतो; पण बजेटमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता मी बँकस्टरसह सुरुवात करणार आहे.
आणखी एक स्टारपुत्र बॉलीवूडमध्ये
By admin | Updated: December 5, 2014 23:27 IST