Join us

'ऑस्कर गोज टू...'च्या घोषणेत नावाचा घोळ!

By admin | Updated: February 27, 2017 12:12 IST

वितरकांच्या चुकीमुळे ला ला लॅण्डला सर्वोत्कृष्ट चित्रपटाृचा पुरस्कार जाहीर झाला, मात्र काही सेकंदातच मूनलाईट चित्रपटाची विजयी म्हणून घोषणा करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २७ - तब्बल १४ विभागांत नामांकने मिळवणा-या ' ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेल्यांना शब्दच सुचत नव्हते. मात्र अवघ्या काही क्षणांतच त्यांच्या या आनंदावर विरजण पडले. वितरकांच्या चुकीमुळे ' ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट चित्रटाचा पुरस्कार घोषित झाला मात्र अवघ्या काही सेकंदात ही चूक सुधारण्यात आली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मूनलाईट'चे नाव घोषित करण्यात आले. या गोंधळानंतर कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कुणाच्या ओठांवर हसू.. असे चित्र दिसू लागले. ' कभी खुशी कभी गम'चा हा अनुभव ऑस्कर सोहळ्यातील उपस्थितांना आला.