Join us

अंजलीबाईंचा जीव गुंतला 'सुयश'मध्ये ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 16:10 IST

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेचे यशोशिखर गाठत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेचे यशोशिखर गाठत आहे. राणा आणि अंजली बाईंनी आता प्रत्येकाच्या मनात स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अंजली बाईंनी मालिकेत राणादाला ज्याप्रमाणे समजून घेतलंय, त्यामुळे अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता अंजलीबाईंना खऱ्याखु-या आयुष्यातील राणा सापडला आहे. अक्षया देवधर आणि सुयश टिळक या दोघांची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. आता हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं उघड झालं आहे. नुकताच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुयशसोबतचा फोटो शेअर केला असून, त्यात तिनं Missing You …Love  अशा पद्धतीची पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोमुळे ती चर्चेत आली असून, सुयश आणि अक्षयाचं नातेसंबंध असल्याचं आता जवळपास उघड झाले आहेत.सुयश टिळक हा सध्या झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेतून जय म्हणून भूमिका साकारत होता. सुयश टिळक आणि अक्षया देवधर हे दोघेही पुण्याचे असून, या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अक्षयाचा सुयश टिळकच खऱ्या आयुष्यातील राणा तर नाही ना, अशा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावतो आहे.

आजमितीस झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने भोळा भाबडा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला आपलंसं केलं आहे.