Join us

ही अभिनेत्री म्हणतेय, छोट्या बाळासोबत जाणार बिग बॉसच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:09 IST

या अभिनेत्रीने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देअनिताची कमेंट तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनिताने या फोटोवर कमेंट केली आहे की, मी बिग बॉसचा पुढचा सीझन माझं बाळ आरवसोबत खेळणार आहे त्यावर रोहितने बाय अशी कमेंट केली आहे.

बिग बॉसचा 14 वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रुबीना दिलैक या सिझनची विजेती ठरली. बिग बॉसमध्ये जायला मिळावे अशी अनेक सेलिब्रेटींची इच्छा असते  आणि आता तर एका अभिनेत्रीने मी माझ्या मुलासोबत बिग बॉसच्या घरात जाणार आहे अशी कमेंट सोशल मीडियावरील एका व्हिडिओवर केली आहे.

अनिता हसनंदानीचा नवरा रोहित रेड्डी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत आपल्याला त्याच्यासोबत सिद्धार्थ शुक्ला दिसत आहे. या व्हिडिओत रोहित सिद्धार्थला त्याचे मसल्स दाखवताना दिसत आहे तर त्यानंतर सिद्धार्थ त्याचे मसल्स दाखवत आहे. सिद्धार्थचे मसल्स पाहून रोहितला धक्का बसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख 96 हजार लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. यातील अनिताची कमेंट तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनिताने या फोटोवर कमेंट केली आहे की,  मी बिग बॉसचा पुढचा सीझन माझं बाळ आरवसोबत खेळणार आहे त्यावर रोहितने बाय अशी कमेंट केली आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानीने मालिकांसोबत चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच अनिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ती बऱ्याचदा आपल्या मुलासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिने बेबी बम्पचेदेखील फोटो शेअर केले होते.

टॅग्स :अनिता हसनंदानी