Join us

पटियाला बेब्सच्या सेटवर अनिरुद्ध दवेला त्याने शिकलेल्या या गोष्टीचा झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:28 IST

अनिरुद्ध दवेने साकारलेली हनुमान ही व्यक्तिरेखा मिनीला या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत आहे. तिचा आहार, व्यायाम आणि शारीरिक प्रशिक्षण वगैरे सर्व बाबतीत हनुमान तिला मार्गदर्शन देत आहे.

ठळक मुद्देमी किक बॉक्सिंग करत असे आणि त्यात मला चांगली गती होती. चित्रीकरणात मला त्याचा थोडा उपयोग झाला आणि यातील काही दृश्यांत मी माझ्या अनुभवाचा उपयोग केला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पटियाला बेब्स ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. या मालिकेला नुकतेच एक रोचक वळण मिळाले आहे. आता परिधी शर्मा अभिनित बबिता तिच्या आयुष्यातील एका नवीन वळणावर येऊन पोचली आहे. तिचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे. या मालिकेतील आई आणि मुलगी दोघीही स्वयंपूर्ण होऊन आपल्या आपल्या जीवनाचा मार्ग शोधत आहेत. या कार्यक्रमात एक आई आणि तिच्या मुलीमधील नात्याचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. बबिताला आता नोकरी मिळवली असून अशनूर कौर अभिनित मिनी ही आपल्या किशोरावस्थेतील समस्यांशी झगडत आहे. तिला एका कॉलेजात प्रवेश मिळवायचा आहे आणि त्यासाठी एक कराटे चॅम्पियनशिप जिंकणे हे तिच्यासाठी खूप आवश्यक आहे. अनिरुद्ध दवेने साकारलेली हनुमान ही व्यक्तिरेखा मिनीला या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत आहे. तिचा आहार, व्यायाम आणि शारीरिक प्रशिक्षण वगैरे सर्व बाबतीत हनुमान तिला मार्गदर्शन देत आहे.

अनिरुद्ध दवेला या संपूर्ण दृश्याच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल आणि प्रत्यक्ष जीवनात त्याने अशी काही शारीरिक अॅक्टीव्हिटी केली आहे का असे विचारले असता तो सांगतो, “या संपूर्ण दृश्याचे चित्रीकरण करताना खूप मजा आली. मी शाळेत असल्यापासून अशा शारीरिक अॅक्टीव्हिटीज शिकण्यास मी उत्सुक होतो. पुढे मी फक्त कार्डिओ आणि अॅथलेटिक कसरत सुरू ठेवली. सुरूवातीस मी किक बॉक्सिंग करत असे आणि त्यात मला चांगली गती होती. चित्रीकरणात मला त्याचा थोडा उपयोग झाला आणि यातील काही दृश्यांत मी माझ्या अनुभवाचा उपयोग केला. अशनूरसोबत काही दृश्ये चित्रित करताना मी तिला स्ट्रेचिंगची चांगली पोश्चर्स आणि काही फ्रंट किक मूव्हज दाखवू शकलो. अशनूर त्या मूव्हजचे अनुकरण चांगले करते आहे आणि ती झटपट शिकते आहे. सध्या ती नियोजित आहार घेत आहे.”

पटियाला बेब्समध्ये आता थोडी अॅक्शन बघायला मिळणार आहे ही मालिका प्रेक्षकांना रात्री आठ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळतेय.

 

टॅग्स :पटियाला बेब्स