Join us  

"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:54 AM

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिकाच्या एका पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 

शनल क्रश रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवराकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. रश्मिका आणि विजय सिक्रेट व्हॅकेशनला गेल्याचंही म्हटलं जात होतं. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिकाच्या एका पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 

पुष्पा फेम रश्मिका मंदानाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने "मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू" असं म्हटलं आहे. याबरोबरच तिने पांढऱ्या रंगाचे हार्ट इमोजीदेखील पोस्ट केले आहेत.

रश्मिकाने विजय देवराकोंडासाठी ही सिक्रेट पोस्ट केली आहे की काय? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय चर्चेत आले आहेत. 

रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यांची ऑनस्क्रीन जोडीही प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, रश्मिका किंवा विजयने याबाबत अजून कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल'सिनेमात रश्मिका मुख्य भूमिकेत दिसली होती. तर विजय फॅमिली स्टार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडासेलिब्रिटी