अभिनेता अनिल कपूरचा आगामी चित्रपट ‘दिल धडकने दो’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट क्वालालंपूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (आयआयएफए)मध्ये दाखविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनिल आणि संपूर्ण ‘दिल धडकने दो’ची टीम खुशीत आहे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनिलसोबत रणवीर सिंग, प्रियंका चोप्रा, शेफाली शाह, फरहान अख्तर आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.
अनिल आनंदात
By admin | Updated: April 10, 2015 23:58 IST