Join us

अ‍ॅंजेलिना जोलीने नाश्त्यामध्ये खाल्ले स्पायडर्स आणि विंचू

By admin | Updated: February 22, 2017 13:02 IST

हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोली हिला आपल्या मुलांसह शिजवलेले टारांटुला स्पायडर्स आणि विंचू खातानाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
कंबोडिया, दि. 22 - हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोली हिला आपल्या मुलांसह शिजवलेले टारांटुला स्पायडर्स आणि विंचू खातानाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखविण्यात आले आहे. 
'दे किल्ड माय फादर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी  41 वर्षीय अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोली आपल्या मुलांसह कंबोडियामध्ये दाखल झाली आहे. यावेळी तिने बीबीसी वर्ल्ड न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर येथील स्थानिक खाद्य संस्कृतीचा तिने आस्वाद घेतला. तसेच, ज्यावेळी टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरु होते. त्यावेळी तिने चक्क एका पटांगणात टारांटुला स्पायडर्स आणि विंचू शिजवले आणि त्याचा मुलांसह नाश्ता केला.  
दरम्यान, कंबोडियामधील नोम पेह मार्केटमध्ये स्पायडर्सपासून बनलेली डिश खुलेआम विकली जाते. दुपारचा नाश्ता करण्यासाठी जास्तीत जास्त लोक या खाद्याला पसंतील देतात. 
 

(साभार - युट्यूब)