Join us

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 08:00 IST

आता ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मराठी थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी…ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत असे ते डॉ.काशिनाथ घाणेकर... यांनी कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात यांनी अढळ स्थान मिळवले. स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुद्धा डॉ. काशिनाथ घाणेकरच... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास वायाकॉम18 स्टुडीओज ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाद्वारे मागील वर्षी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

 ज्यांच्या प्रवेशाने टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारलं आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याने तसेच सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर) यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले... मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ दिलेल्या सुपरस्टारचा जीवनप्रवास - ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ कलर्स मराठीवर ५ मे दु. १२ आणि संध्या. ७.०० वा. नक्की बघा. 

टॅग्स :काशिनाथ घाणेकरकलर्स मराठी