Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् धर्मेंद्र म्हणाले,‘भावा, तू दोन दिवसांत ठणठणीत होशील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 18:52 IST

त्यांचे मित्र, भाऊ असलेल्या धर्मेंद्र यांनी त्यांना टिवट करून ‘भावा, तू दोन दिवसांत ठणठणीत होशील, ’ असे टिवट केले आहे. तसेच हेमामालिनी यांनीही टिवट करून त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करतेय, असे टिवट केले आहे.

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. त्यांच्यासोबतच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, आराध्या बच्चन हे देखील पॉझिटिव्ह झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र, त्यांचे मित्र, भाऊ असलेल्या धर्मेंद्र यांनी त्यांना टिवट करून ‘भावा, तू दोन दिवसांत ठणठणीत होशील, ’ असे टिवट केले आहे. तसेच हेमामालिनी यांनीही टिवट करून त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करतेय, असे टिवट केले आहे.

८०च्या दशकात धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन तसेच अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी या जोड्या रसिकांच्या मनावर राज्य करायच्या. त्यांच्यावर प्रेक्षक खुप प्रेम करायचे. आजही त्यांचे प्रेम तसेच कायम आहे. मात्र या जोड्यांमध्ये एकमेकांबद्दल तेवढेच प्रेम आणि आदर निर्माण झालेला आहे. एकेकाळी पडद्यावर भूमिका गाजवलेले कलाकार आज एकमेकांना आधार देताना दिसत आहेत. बिग बी कोरोना पॉझिटिव्ह होताच त्यांचे जुने मित्र धर्मेंद्र आणि हेमामालिनी हे त्यांना मानसिक आधार देताना दिसतात. त्यांनी टिवट करून बिग बींच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. 

हेमामालिनी ट्विट करत म्हणतात,‘अमितजी, मी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतेय. तुम्ही लवकरच चांगले होऊन घरी परत याल.’

केंद्रीय स्वास्थ्य मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट केले की, ‘प्रिय अमितजी, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही सर्वांचे आदर्श आहात. आयकॉनिक सुपरस्टार आहात. आम्ही तुमची विशेष काळजी घेऊ.’ 

अशाच त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे चाहते, आप्तस्वकीय, जुने सहकलाकार हे या प्रवासात त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी टिवट करून सांगितले आहे.

 

टॅग्स :धमेंद्रअमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्या