Join us

पैसे वाचवण्यासाठी चंकी पांडे करायचा हे काम, खुद्द लेकीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:23 IST

‘कपिल शर्मा शो’मध्ये अनन्याने पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत.

‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अनन्या पांडे सध्या ‘पती पत्नी और वो’ या आपल्या दुस-या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या लवकरच ‘कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहे. नुकतेच या एपिसोडचे शूटींग पूर्ण झाले. यावेळी अनन्याने पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केलेत. विशेषत: डॅड चंकी पांडेबद्दल तिने अनेक शॉकिंग गोष्टी सांगितल्या.

‘हाऊसफुल 4’ हिट झाल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुला ट्रिट दिली? असा प्रश्न कपिलने अनन्याला केला. यावर, नाही, त्यांनी मला कुठलीच पार्टी दिली नाही. माझ्या मते, पती पत्नी और वो हिट झाल्यानंतर मलाच त्यांना ट्रिट द्यावी लागेल, असे अनन्या म्हणाली. चंकी पांडे बॉलिवूडचा अतिशय कंजुष अभिनेता म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर कपिलने अनन्याला आणखी एक प्रश्न विचारला.  चंकी ‘हाऊसफुल 4’च्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा वर्षभरातील त्याच्या सर्व पार्ट्या स्पॉन्सर असतात, असे त्याने सांगितले होते. हे खरे आहे का? तुझी बर्थ डे पार्टी सुद्धा स्पॉन्सर असते का? असे कपिलने अनन्याला विचारले. यावर हो, माझे मॉम डॅड माझी बर्थ डे पार्टी सुद्धा स्पॉन्सर करत, असे अनन्या म्हणाली.

शोदरम्यान कपिलने अनन्याला तिच्याबद्दलच्या काही अफवा ऐकवल्या. अर्धे तिकिट लागावे म्हणून तुझे वडिल तुझे वय खोटे सांगायचे, अशी एक अफवा आहे, ही खरी आहे का? असा प्रश्न कपिलपे अनन्याला केला. यावर, ही अफवा खरी आहे, असे अनन्या म्हणाली. आम्ही डिज्नीलँड व अशा काही ठिकाणी जायचो तेव्हा अनेकदा ते माझे वय खोटे सांगून हाफ तिकिट खरेदी करायचे आणि पैसे वाचवायचे, असे अनन्या म्हणाली.

टॅग्स :अनन्या पांडेचंकी पांडेकपिल शर्मा द कपिल शर्मा शो