आपल्या अभिनयशैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी तारका अमृता सुभाष तिच्या फॅशन स्टाईलबद्दल फारच अवेअर आहे. टसर सिल्क डिझायनर साड्या नेसायला तिला आवडतातच, पण त्यासोबत हॉल्टर नेक ब्लाऊजही तिचे फेवरेट. आता साडीच डिझायनर म्हटल्यावर त्यावर ज्वेलरीसुद्धा हटकेच असायला पाहिजे, असे अमृता म्हणते. मोस्टली ती साड्यांवर मोठे झुमके घालते, ज्यामुळे एकदम ग्लॅमरस लुक येतो. नचिकेत बर्वे या डिझायनरने तिच्यासाठी इटली फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी खास साडी डिझाइन केली होती, असे ती सांगते.
अमृताला आवडतात टसर सिल्क डिझायनर साड्या
By admin | Updated: January 1, 2016 04:14 IST