Join us

अमृताची कोचिन भरारी

By admin | Updated: April 11, 2016 01:01 IST

मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा, म्हणणारी आपली अमृता खानविलकर घरी नाही तर थेट पोहोचली आहे कोचीनला. अमृता कोचीनला का गेली असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल

मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा, म्हणणारी आपली अमृता खानविलकर घरी नाही तर थेट पोहोचली आहे कोचीनला. अमृता कोचीनला का गेली असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल. कामाच्या स्ट्रेसमधून थोडा निवांत वेळ काढून ती मस्तपैकी लाँग हॉलिडेसाठी कोचीनला गेली आहे.असे वाटत असेल तर तसे बिलकुल खरं नाहीये. अमृता कोचीनला गेलीय ती फक्त कामासाठी म्हणजेच तिच्या आगामी एका चित्रपटाचे शूटिंग कोचीनला असल्याने ती सध्या कोचीनच्या ब्युटिफुल अ‍ॅटमॉस्पिअरमध्ये रंगून गेली आहे. अमृताने सीएनएक्सला तिच्या या कोचीनच्या शूटिंगबाबत सांगितले. पहिल्यांदाच मी शूटिंगसाठी कोचीनला आले आहे. आमची संपूर्ण टीम माझ्यासोबत असून, आम्ही मजा, मस्ती धमाल करीत कोचीनमध्ये शूट करीत आहोत. तसेच हे शूटिंग खूप वेगळ्या पद्धतीचे असल्याचे तिने सांगितले आहे. एवढेच नाही, तर याच चित्रपटाच्या पुढच्या सीन्सच्या शूटिंगसाठी ती एका आठवड्याकरिता परदेशात जाणार आहे.तिथेदेखील असे वेगळे शूटिंग होणार असल्याचे अमृता म्हणाली. अमृताने या सिनेमाचे नाव जरी गुलदस्तात ठेवले असले, तरी पुढील एका महिन्याभरात आपल्याला नक्कीच या चित्रपटाबाबत काही गोष्टी समोर येतीलच. अमृताला तिच्या या कोचीन भरारीसाठी शुभेच्छा.