Join us

अमृता खानविलकरच इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासुबाई, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:09 IST

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राकडे इंडस्ट्रीतमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राकडे इंडस्ट्रीतमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. काही दिवसांपूर्वीच पती हिमांशुचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृता वैष्णो देवीला गेली होती. अमृता सध्या पतीसोबत दिल्लीला आहे. हिमांशुने अमृता आणि त्याच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माझ्या आयुष्यातील दोन आधार स्तंभ असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. अमृताच्या सासूबाई अनु मल्होत्रा या दिसायला तिच्या इतक्याच सुंदर आहेत. तसेच या फोटोमध्ये सासू-सुनेतलं स्पेशल बॉडिंग स्पष्ट दिसतेय. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवरच अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते. हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठी. दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं होते. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी जवळजवळ 9 वर्षे अमृता व हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते.

अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच अमृता पुष्कर जोगसोबत 'वेल डन बेबी'या सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :अमृता खानविलकर