मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. विशेष म्हणजे अमृताने विना मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
विना मेकअप लूकमध्येही अमृता खानविलकर दिसते तितकीच सुंदर, फोटोवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 07:00 IST