Join us

अमृता अरोराचे करिअर धोक्यात

By admin | Updated: October 6, 2014 02:56 IST

फरदीन खानसोबत ‘कितने दूर किसने पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस प्रारंभ करणारी अमृता अरोरा आता विस्मृतीत गेली आहे.

फरदीन खानसोबत ‘कितने दूर किसने पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमधील कारकीर्दीस प्रारंभ करणारी अमृता अरोरा आता विस्मृतीत गेली आहे. अमृताने अनेक चित्रपट केले; परंतु बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यात ती अपयशी ठरली. ‘लेस्बियन रिलेशनशिप’सारख्या वादग्रस्त विषयावर बनलेल्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत अफेअर असो का लग्नापूर्वी गर्भवती असल्याची चर्चा, यामुळे तिची प्रतिमा डागाळली. परिणामी आता ती अडगळीत पडली आहे. दबंग सलमान खानची ती नातेवाईक आहे. सलमानची वहिनी मलाईका अरोराची अमृता ही बहीण आहे; परंतु सलमानशी असणारे नातेही तिच्या उपयोगी पडले नाही. आता तर तिच्या हातात एकही चित्रपट नसल्याची चर्चा आहे.