Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा फोटो झालाय व्हायरल, पाहून चाहते झाले अवाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:31 IST

एक अभिनेत्री विमानात बसलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर तिने नाकापर्यंत टी-शर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा फोटो पाहून हा निराळा मास्क असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसध्या कोरोनाच्या प्रसारामुळे सगळेच मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच हा फोटो नेटिझन्सच्या पसंतीस पडला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता एका अभिनेत्रीचा विमानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

एक अभिनेत्री विमानात बसलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर तिने नाकापर्यंत टी-शर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा फोटो पाहून हा निराळा मास्क असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ही अभिनेत्री अमृता अरोरा असून हा फोटो नेटिझन्सना प्रचंड आवडत आहे. 

सध्या कोरोनाच्या प्रसारामुळे सगळेच मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच हा फोटो नेटिझन्सच्या पसंतीस पडला आहे. पण हा फोटो आताचा नसून काही वर्षांपूर्वीचा असेल असा अंदाज नेटिझन्स लावत आहेत. 

अमृताने आवारा पागल दीवाना, एक और एक ग्यारह असे अनेक सिनेमांमध्ये काम केेले आहे. या सिनेमांनी अमृताला फार काही यश दिले नाही. मात्र अजय देवगणच्या जमीन या सिनेमात ‘दिल्ली की सर्दी’ हे आयटम सॉन्ग तिने केले आणि अचानक ती चर्चेत आली. या गाण्यातील अमृताचा बोल्ड अवतार पाहून भल्याभल्यांना घाम फुटला होता. या गाण्याने अमृताला नवी ओळख दिली. पण काही वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करत नाहीये. 

टॅग्स :अमृता अरोरा