Join us

FTII वादावर तोडगा निघेल अशी आशा - अमिताभ बच्चन

By admin | Updated: October 11, 2015 14:04 IST

एफटीआयआयमधील वादावर विद्यार्थी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरु असून या वादावर लवकरच तोडगा निघेल असा आशावाद बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - एफटीआयआयमधील वादावर विद्यार्थी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरु असून या वादावर लवकरच तोडगा निघेल असा आशावाद बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आहे. मात्र गुलाम अलींच्या  कार्यक्रमावरुन सुरु असलेल्या वादावार बच्चन यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

महानायक अमिताभ बच्चन यांचा ७३ वा वाढदिवस असून यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी चाहत्यांमुळेच इथपर्यंत आलो असून यासाठी मी त्यांचा आभारी आहे असे बच्चन यांनी सांगितले. पाकिस्तानी गझल गायक गुलामी अली यांच्या कार्यक्रमावरुन सुरु असलेल्या वादावर अमिताभ म्हणाले, हा राजकीय मुद्दा असल्याने मी यावर भाष्य करणार नाही. दिवसरात्र मी स्वतःविषयीची माहिती सोशल मीडियाव्दारे देत असल्याने हल्ली मलादेखील पत्रकार झाल्यासारखे वाटते असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.