Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दंगल'च्या शुटिंगदरम्यान आमीरला होती मृत्यूची भीती

By admin | Updated: July 5, 2016 08:19 IST

दंगल' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं, तर आपल्या भूमिकेसाठी एखादा चांगला कलाकार शोधा असा सल्ला आमीरने दिग्दर्शक नितेश तिवारींना दिला होता

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 05 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला 'दंगल' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मृत्युची भीती वाटत होती. 'शुटिंगदरम्यान आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झालं, तर आपल्या भूमिकेसाठी एखादा चांगला कलाकार शोधा', असा सल्ला आमीरने दिग्दर्शक नितेश तिवारींना दिला होता. 'दंगल'  चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत आहे.  ही भुमिका साकारण्यासाठी आमीर खानने प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपटात तरुण आणि वयस्कर अशा दोन्ही भुमिका निभावत असल्याने आमीरला वजन कमी जास्त करावं लागलं होतं. 
 
'मला जर काही झालं तर माझ्या जागी तरुण महावीर फोगट यांची भुमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन, शाहिद कपूर यांच्यापैकी एखाद्या अभिनेत्याला घ्या', असं आमीर खानने दिग्दर्शकाला सांगून ठेवलं होतं. 
 
 
'संपुर्ण चित्रपट माझ्यावर अवलंबून असल्याने मला काही झालं तर ? अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. त्यामुळेच चित्रपटाचं शुटिंग शेवटच्या टप्प्यात असताना माझा मृत्यू झाल्यास कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे मी लिहून ठेवलं होतं', असं आमीर खानने सांगितलं आहे. 
 
(आमीर खानने शेअर केला 'दंगल'मधील रावडी लूक)
 
 'दंगल'  चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत आहे.  कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपट 23 डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.