Join us

आमीरने केलं 'नटसम्राट'चं कौतुक

By admin | Updated: February 17, 2016 16:23 IST

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने ट्विटरवरुन नटसम्राट चित्रपटाच भरभरुन कौतुक केलं आहे

ऑनलाइन लोकमत -
 
मुंबई, दि. 17 - नटसम्राट चित्रपटावर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत असताना बॉलिवूडदेखील यात मागे नाही आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननेदेखील नटसम्राट चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. 
 
आमीरने खानने ट्विटरवरुन आपल्याला हा चित्रपट खुप आवडल्याचं सांगितलं आहे. आमीरने चित्रपटाच कौतुक करताना मी काल रात्री हा चित्रपट पाहिला, नानांनी अत्यंत कसदार अभिनय केला आहे, खरंच असा नट होणे नाही' असं म्हणल आहे.
 
आमीर खानने नानांसोबत विक्रम गोखले यांच्या अभिनयाचदेखील कौतुक केलं आहे, तसंच नटसम्राटच्या संपुर्ण टीमचे आभारदेखील मानले आहेत.