Join us

दिग्दर्शनातही अमराठी टॅलेंट

By admin | Updated: July 20, 2015 02:24 IST

अर्थकारण बदलले, की मग अनेक चांगल्या गोष्टी घडून येऊ लागतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतही तसेच घडू लागले आहे. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक मोठ्या संख्येने

अर्थकारण बदलले, की मग अनेक चांगल्या गोष्टी घडून येऊ लागतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतही तसेच घडू लागले आहे. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित होऊ लागल्यावर आता अनेक अमराठी दिग्दर्शकही मराठीमध्ये येऊ लागले आहेत. या नवीन ‘टॅलेंट’मुळे मराठीमध्ये अनेक नवीन विषयही हाताळले जाऊ लागले आहेत. ‘शटर’ चित्रपटाने मराठीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही.के. प्रकाश हे मल्याळम् चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोणताही मालमसाला नसतानाही केवळ कथेवर आणि आशयावर चांगला चित्रपट असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. दासबाबू या बंगाली दिग्दर्शकानेही गेली अनेक वर्षे विविध विषयांवरील मराठी मालिका व चित्रपट दिग्दर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीवर आपली छाप पाडली आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘लढा’, ‘श्रीमंताची लेक’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘एक धागा सुखाचा’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘आई’, ‘फक्त तुझ्याचसाठी’, ‘मित्रा याला जीवन ऐसे नाव’ अशा अनेक मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. दासबाबूंचा ‘ब्रेव्हहार्ट - जिद्द जगण्याची!’ हा चित्रपट मुंबईत घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. इतर भाषांतील दिग्दर्शकही मराठीत येत असल्याने मराठी कलाकारांनाही त्याचा फायदा होत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, ‘‘शटरचे शूटिंग अगदी विक्रमी कमी कालावधीत पूर्ण झाले, याचे कारण म्हणजे चित्रीकरणास प्रारंभ करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची अगदी अभ्यासपूर्वक तयारी या मंडळींनी केली होती. शूटिंगसाठी स्पॉट निवडतानाही पुढे काय अडचणी येऊ शकतात, याचा विचार केला होता. तांत्रिकदृष्ट्याही वेगळा अनुभव मिळाला.’’एका बाजूला मराठीमध्ये अनेक दिग्दर्शक येत असताना मराठीतील चांगल्या दिग्दर्शकांना हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगल्या संधी मिळत आहेत. ‘डोंबिवली फास्ट’चा दिगदर्शक निशिकांत कामत अजय देवगणचा ‘दृश्यम्’ दिग्दर्शित करीत आहे.