Join us

सैफीना-करणमध्ये ‘आॅल इज वेल’

By admin | Updated: September 30, 2016 03:23 IST

‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात शाहरुख खान केमिओ रोलमध्ये दिसणार आहे. पण, याअगोदर शाहरुखच्या जागेवर सैफ अली खान हा दिसणार होता. त्यामुळे दिग्दर्शक करण

‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात शाहरुख खान केमिओ रोलमध्ये दिसणार आहे. पण, याअगोदर शाहरुखच्या जागेवर सैफ अली खान हा दिसणार होता. त्यामुळे दिग्दर्शक करण जोहरवर सैफ आणि करिना हे दाम्पत्य रागावले अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता असे कळतेय की, सैफीना-करण जोहरमध्ये सर्वकाही ठीक आहे. बी-टाऊनच्या कलाकारांचा आणि चाहत्यांचा असा समज झाला होता की, त्यांच्यात वाद सुरू आहेत. पण, तसे नसून ते तिघेही आजही चांगले मित्र असल्याचे त्यांनी सोशल साईटवर शेअर केले आहे. करणने सांगितले आहे की, सैफ-करिना आणि माझ्यामध्ये बिनसले असल्याच्या बातम्यांत काही तथ्य नसून सैफच्या अंगठ्याला झालेल्या जखमेमुळे तो माझा चित्रपट करू शकला नाही. ते तर माझ्या कुटुंबासारखे आहेत.