Join us

'रणबीर-कॅटरिना' मध्ये ऑल इज वेल

By admin | Updated: December 31, 2015 18:02 IST

बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातला दुरावा मिटला असल्याच एका फोटोवरुन दिसते आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातला दुरावा मिटला असल्याच एका फोटोवरुन दिसते आहे. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक फोटो फिरत असताना दिसतो आहे, यामध्ये दोघ बाल्कनीत एकमेंकाचा चुंबन घेत असल्याच दिसते आहे. 
रणबीर आणि कॅटरिनाच्या नात्यात सतत उतार चढाव पाहायला मिळाले आहेत.  मध्यंतरी त्यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा देखील माध्यमात रंगल्या होत्या.  मात्र अलिकडेच कपूर फॅमिलीने आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीमध्ये कटरिना सामिल झाली, दोघेही ज्या प्रकारे सहभागी झाले होते त्यावरुन त्यांच्यात कोणताच तणाव नसावा असे दिसते. कपूर फॅमिलीच्या ख्रिसमस फोटोमध्ये ही दिसून आली. 
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ गेली अनेक महिने आपले नाते लपवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत होते, पण आता त्यांनी मोकळेपणाने लोकांसमोर यायचे ठरवले असावे. कारण सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो फिरत आहे. 
कामावरुन परत आलेल्या कॅटरिनाला घराच्या बाल्कनीमध्ये रणबीरने किस केले.  दोघांनी एकमेकांना मिठीत घेऊन चुंबन घेतल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. 
सध्या दोघेही अनुराग बसूच्या 'जग्गा जासूस' चित्रपटात एकत्र काम करत आहेत. २०१६च्या मध्यांतरापर्यंत हा चित्रपट प्रर्दशित होण्याचा शक्याता आहे.