बॉलीवूडमधील ‘हॉट अभिनेत्री’च्या रेसमध्ये आलिया भट्ट स्थान टिकवून आहे. काही वर्षांपासून आलियाने हळूहळू, निष्ठेने तिचा मार्ग तयार केला. तिने आत्तापर्यंत वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर या अभिनेत्यांबरोबरच सिनीअर रणदीप हुड्डा, शाहीद कपूर सोबतही काम केले. तिचा फिटनेस तिने प्रत्येकच चित्रपटात सिद्ध केला. ती आता शाहीदसोबत ‘शानदार’ आणि ‘उडता पंजाब’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. एकेकाळी शाहीद आलियाला खूप आवडायचा. ती फक्त १० वर्षांची असेल जेव्हा तिने शाहीदचा ‘इश्क विश्क’ पाहिला. त्या वेळी माझ्यासारख्या किशोरवयीन कोणत्याही तरुणीला शाहीद आवडेल असा तो दिसत होता, असे ती म्हणते.
आलिया ‘क्रश’ आॅन शाहीद?
By admin | Updated: August 2, 2015 23:57 IST