Join us  

जे रणबीरला नाही जमलं ते आलियाने करुन दाखवलं! जागतिक पातळीवर केली 'ही' मोठी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 7:23 AM

करिअरच्या सुरुवातीला अभिनयाने ट्रोल झालेल्या आलिया भटने जागतिक पातळीवर मोठी कामगिरी केलीय. काय केलंय आलियाने? जाणून घेण्यासाठी क्लिक करा (alia bhatt)

आलिया भट ही सध्या मनोरंजन विश्वातील टॉपची अभिनेत्री आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आलियाला आपण आजवर विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. आलियाने  गेल्या काही वर्षात विविध सिनेमांमधून अभिनय करत चाहत्यांचं प्रेम मिळवलंय. करिअरच्या सुरुवातीला अभिनयामुळे ट्रोल झालेली आलिया आता तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. अशातच आलियाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

 जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भटचाही समावेश झाला आहे. 'टाइम्स'च्या टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्टचा समावेश झाला आहे. या यादीत आलिया भटसह जगभरातील लोकांची नावे आहेत. या यादीत 'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेलचाही समावेश करण्यात आला आहे. देव पटेल हा मुळात भारतीय ब्रिटिश अभिनेता आहे. याशिवाय  कुस्तीपटू साक्षी मलिकचाही समावेश झाला आहे. 

आलिया भट आता बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत आहे. आलियाने गेल्या वर्षी 2023 मध्ये 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आलिया बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आहे, यात शंका नाही. आलियाने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आलिया सध्या 'जिगरा' सिनेमाचं शुटींग करत आहे. ती अनेकदा पती रणबीर कपूर आणि लेक राहासोबत स्पॉट होताना दिसते.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडरणबीर कपूर