Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:09 IST

आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते  एक आहे. आलिया आणि रणबीर लग्न करणार अशी चर्चा सतत ऐकायला मिळते. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार  2020 च्या शेवटी दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. काही दिवसांपूर्वी आलियाने मुंबईतल्या जुहू परिसरात 13 कोटींचं आलिशान घरं खरेदी केलं त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर पकडला. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आलिया लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझायन केलेला लहंगा परिधान करणार आहे.  

  रिपोर्टनुसार आलियाने एप्रिल महिन्यात सब्यसाचीची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वेडिंग लहंग्यासंदर्भात चर्चा झाली. सब्यसाचीने डिझायन केलेले लहंगा अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राने आपल्या लग्नात परिधान केला होता. 

सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर न्यूयॉर्कवरुन मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येईल. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले ते, ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर