Join us

अक्षयकुमारचं 2.0 मधलं व्हिलनचं खतरनाक रुपडं

By admin | Updated: March 23, 2016 14:00 IST

अक्षयकुमार बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच खलनायक साकारणार आहे. तो देखील रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात

ऑनलाइन लोकमत
अक्षयकुमार बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच खलनायक साकारणार आहे. तो देखील रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात. या चित्रपटामध्ये त्याचं रुप हे कमालीचं वेगळं असून पटकन न ओळखता येणारं आहे. सोशल मीडियावर अक्षयचं हे रुप व्हायरल व्हायला लागलेलं आहे.
अक्षयच्या चाहत्यांना कदाचित धक्का बसेल असं खतरनाक रूप त्यानं स्वीकारलं आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने डॉ. रिचर्डचा रोल केला असून तो एक शास्त्रज्ञ असतो जो कावळ्यामध्ये रुपांतरीत होतो. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल स्टेडियममध्ये या चित्रपटाचं शुटिंग झालं आणि त्यावेळी अक्षयकुमारचा हा व्हिलनचा चेहरा सगळ्यांसमोर आला.