Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर या व्यक्तीला करतेय मिस... सोशल मीडियाद्वारे दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:58 IST

अक्षया एका व्यक्तीला प्रचंड मिस करत असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ही व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पाच तासांत 10 हजाराहून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील राणादा, अंजली ही पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेमुळे अक्षया देवधरला प्रेक्षक अंजली म्हणूनच ओळखतात.

अक्षया एका व्यक्तीला प्रचंड मिस करत असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ही व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. अक्षया दुसऱ्या कोणाला नव्हे तर अंजली या तिच्या व्यक्तिरेखेला मिस करत आहे. तिनेच एक व्हिडिओ शेअर करून याविषयी सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पाच तासांत 10 हजाराहून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. तसेच आम्ही देखील अंजलीला मिस करत आहोत असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाई बनलेली अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात पहायला मिळाली. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली.

टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगला