तापसी पन्नू आणि अक्षय कुमार लवकरच रिलीज होणा:या ‘बेबी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ती या चित्रपटात फक्त अक्षयची हिरोईन नाही, तर त्यांच्यात पंजाबी कनेक्शनही आहे. अक्षय आणि तापसी दोघेही पंजाबी आहेत, त्यामुळे दोघे चित्रपटाच्या सेटवरही पंजाबीमध्ये संभाषण करताना दिसतात. तापसीच्या मते या पंजाबी फॅक्टरनेच अक्षय आणि तिच्यामध्ये एक वेगळा बाँड निर्माण केला आहे.