Join us  

न्यासा देवगणसोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा, डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 12:41 PM

अक्षय कुमारचा लाडका लेक आरव कुमार आणि न्यासा देवगण डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

मनोरंजन क्षेत्रात असे अनेक स्टारकिड्स आहेत, ज्यांच्यामध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळते. सारा अली खान आणि जान्हवी कपूरपासून ते सुहाना खान आणि अनन्या पांडेपर्यंत अनेक स्टार किड्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सध्या न्यासा देवगण आणि आरव कुमार यांच्या मैत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  सध्या सोशल मीडियावर न्यासाचा आरवसोबतचा  (Aarav Bhatia) फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

अक्षय कुमारचा लाडका लेक आरव कुमार लाइमलाइटपासून दूर राहतो, तर दुसरीकडे अजय आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन अनेकदा आउटिंग आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते. एकत्र डिनर केल्यानंतर न्यासा आणि आरव आता युरोपमधील एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसले. सेलेब्सचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीने या दोघांचे फोटो ऑनलाईन लीक केले आहेत.

हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी आरवला "ज्युनियर खिलाडी" म्हणू लागले आहेत. आरव आणि न्यासाला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान यााआधी न्यासा ही वेदांत महाजनला डेट करत असल्याचं बोललं जातं होतं. अक्षयचा लाडका लेकही एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला होता. 

अक्षय आणि ट्विंकलचा मुलगा आरव हा इतर स्टारकिड्सप्रमाणे प्रकाशझोतात नसतो. एका मुलाखतीत खुद्द अक्षयने सांगितलं होतं की त्याला लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. आरव भाटियाला खेळात जास्त रस आहे. त्याने Okinawa, Kudo आणि Goju Ryu Karate ब्लॅक बेल्ट जिंकला आहे. तसंच ज्युडो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकही मिळवलं आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडकाजोलअजय देवगण