Join us  

ब्रेकअपच्या वेदना कमी करण्यासाठी खिलाडी कुमार अक्षयच्या खास टिप्स, नक्की होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:00 AM

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनं ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. ब्रेकअप मधून बाहेर कसं पडायचं हे त्याने तरुणांना सांगितलं.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. सध्या तो 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अलाया एफ व मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' ११ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतेत एका मुलाखतीमध्ये अक्षयने तरुणांना ब्रेकअप मधून बाहेर कसं याययं यासंदर्भात सल्ला दिला आहे. 

'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये अक्षय कुमारला ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अक्षयने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. ब्रेकअप मधून तो कसा बाहेर पडायचा हे त्याने सांगितलं आहे. यावेळी बोलताना आतापर्यंत दोन-तीनवेळा ब्रेकअप झाल्याचा खुलासा अक्षयनं केला. तो म्हणाला,  'ब्रेकअप झाल्यानंतर मी व्यायाम करायचो. ब्रेकअपनंतर राग अनावर होतो. प्रमाणापेक्षा जास्त जेवण करायचो. त्यामुळे तरुणांनीदेखील ब्रेकअपमधून बाहेर पडताना जास्त विचार करू नये. व्यायाम करावा, योग्य आहार करावा', असा सल्ला अक्षयने तरुणांना दिला.  अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर लग्नाआधी अक्षयचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. 

खिलाडी कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास अक्षय कुमार लवकरच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमात झळकणार आहे. 'सिंघम अगेन' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. अक्षयसह या सिनेमात अजय देवगन, करीना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि टायग श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अक्षयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 'स्काय फोर्स' हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच अभिनेत्याचे 'वेलकम टू द जंगल','हाऊसफुल्ल 5' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीटायगर श्रॉफदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट