Join us  

अजय देवगणची लेक बऱ्याच दिवसांनी दिसली, नीसाचा विचित्र मेकअप पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 11:08 AM

कॅमेऱ्यासमोर थोडंही न हसता थेट ती रेस्टॉरंटच्या आत गेली. 

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgn) लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) बऱ्याच दिवसांनी पुन्हा पापाराझींसमोर आली आहे. यावेळी नीसाला तिच्या अॅटिट्यूडमुळे आणि विचित्र मेकअपमुळे ट्रोल केलं जात आहे. नुकतीच ती एका नाईट क्लबमध्ये पोहोचली असता तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. मात्र कॅमेऱ्यासमोर थोडंही न हसता थेट ती रेस्टॉरंटच्या आत गेली. 

नीसा देवगण नुकतंच तिचा बेस्ट फ्रेंड ओरीच्या पार्टीत दिसली. पार्टीसाठी एन्ट्री घेतानाचा आणि बाहेर पडतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिने कलरफुल स्कीन टाईट वनपीस घातला आहे. तर यावर तिने अगदी गडद मेकअप केलेला दिसतोय. नीसाचा हा लूकही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नसून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. मधल्या काळात नीसा गायब झाली होती. आता बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर आल्यानंतर ती पुन्हा ट्रोल होत आहे. 

नीसाचा हा व्हिडिओ पाहून कमेंट्स सेक्शनमध्ये ऊत आलाय. 'मेकअप जरा जास्तच झाला', 'सगळं एकदम नकली वाटत आहे' अशा कमेंट्स तिच्या लूकवर आल्या आहेत. नुकतंच अजय देवगणने लेकीवर होत असलेल्या ट्रोलिंगवर कॉफी विद करणमध्ये भाष्य केलं होतं. तिला आणि आम्हालाही या गोष्टी आवडत नाहीत. पण तुम्ही हे बदलू शकत नाही.  त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर प्रेम करता. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात याचा अर्थ सगळेच तुमच्याबद्दल तोच विचार करतात असं नाही. त्यामुळे या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. तुम्ही चांगल्या गोष्टींबद्दल पोस्ट करता पण कोणीही ते वाचत नाही. सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत नसूनही ते स्वत:ला स्टार समजतातअसं त्याने स्पष्टीकरण दिलं होतं. 

टॅग्स :अजय देवगणकाजोलसोशल मीडियाट्रोल