Join us

अजय-अतुल यांच्या आलिशान घराची झलक, पाहा डोळे दिपवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 09:00 IST

शाहरुख,सलमान यांच्या घरांप्रमाणे अजय-अतुल यांच्या घराचे फोटोंनाही प्रचंड पसंती मिळत असल्यचे पाहायला मिळत आहे.

संगीतप्रेमींवर गारुड घालणाऱ्या अजय - अतुल या जोडींबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची रसिकांची उत्सुकता असते.खास अजय-अतुल फॅन्ससाठी त्यांची एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.आपलं स्वप्नातलं घर खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.

 

 

हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.

याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकार असो किंवा मराठी कलाकर यांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अजय-अतुल यांच्याही घराचे आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय-अतुल यांनी सिनेसृष्टीत मोठ्या मेहनतीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.अजय-अतुल या दोघा भावांनी आज पुण्यात एक मोठे आलिशान आशियाना उभारला आहे.पुण्यातील बाणेरमध्ये अजय-अतुल यांचे हे घर आहे.

तीन बेडरूम, लिविंग एरिया,किचन तसेच एक साऊंड स्टुडिओही या घरात बनवून घेतला आहे.या घराचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.सचिन खाटपे यांनी अजय- अतुल यांच्या घराचे इंटेरियर केले आहे.अजय-अतुल यांच्या घराचे हे आतले खास फोटो फोटोग्राफर प्रशांत भट यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.

आता सोशल मीडियावर शाहरुख,सलमान यांच्या घरांप्रमाणे अजय-अतुल यांच्या घराचे फोटोंनाही प्रचंड पसंती मिळत असल्यचे पाहायला मिळत आहे. घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.