Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्याची अखेर वर्णी

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजित सिंगच्या आयुष्यावरील चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजित सिंगच्या आयुष्यावरील चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात सरबजितच्या बहिणीच्या भूमिकेसाठी याआधी कंगना रनावतचे नाव आघाडीवर होते. यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी ओमंग कुमारने घेतल्यावर ‘मेरी कॉम’फेम प्रियंका चोप्राच या भूमिकेसाठी नक्की झाल्याचे बोलले गेले. मात्र आता कंगना आणि पीसीला मागे टाकत बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्याची यासाठी निवड झाली आहे. पुनरागमनानंतर ऐश्वर्याची जादू अजूनही शाबूत आहे, हे यावरून दिसते.