ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटांसाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफरआली आहे आणि हा हॉलिवूड प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी तिने एक टीमही हायर केल्याचे कळतेय.प्रियंका चोप्रा व दीपिका पादुकोण यांच्याआधी हॉलिवूडमध्ये ऐश्वर्याचा दबदबा होता. आत्तापर्यंत तिने हॉलिवूडच्या पाच चित्रपटांत काम केले आहे. ब्राईड अॅण्ड प्रिज्युडिस, द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेज, प्रोवोक्ड, द लास्ट लीजन आणि द पिंक पँथर -2 मध्ये ऐश्वर्या झळकली आणि बघता बघता एक आंतरराष्ट्रीय चेहरा बनली. ताज्या हॉलिवूड चित्रपटाला ऐश्वर्याने होकार दिला आहे. सगळे काही जमून आले तर यावर्षा अखेरिस या हॉलिवूडपटाची घोषणा होणे अपेक्षित आहे.
ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा निघाली हॉलिवूडला...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:45 IST
ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटांसाठी सज्ज झाली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा निघाली हॉलिवूडला...!!
ठळक मुद्दे२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.