मुंबई - ऐश्वर्या राय बच्चनने हे मान्य केलंय की, तिला एकेकाळी सुपरहिट ठरलेल्या रात और दिन आणि वो कौन थी हे दोन सिनेमे ऑफर झाले आहेत. पण तिने या सिनेमांना आपला होकार कळवला नाहीये.
काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, ऐश्वर्याला एका डार्क थ्रिलर सिनेमाची ऑफर देण्यात आली आहे. हा सिनेमा 1967 मध्ये आलेल्या रात और दिन सिनेमाचा रिमेक असेत. या सिनेमात प्रदीप कुमार, नर्गिस दत्त आणि फिरोज खान यांनी काम केलं होतं. या सिनेमात नर्गिस यांनी एका अशा महिलेची भूमिका साकारली होती, जी मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डरने ग्रस्त असते. नर्गिस दत्त यांना या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
ऐश्वार्याने याआधीही नर्गिस दत्त यांच्या त्या सिनेमाच्या रिमेकची ऑफर मिळाली आहे. इतकेच नाहीतर संजय दत्त यालाही ऐश्वर्याला त्याच्या आईच्या भूमिकेत बघायचे आहे. ऐश्वर्याने सांगितले की, या सिनेमाबाबत बोलणी सुरु आहे.