Join us  

हार्वे वाइनस्टीनची ऐश्वर्या रायवरही होती वाईट नजर, मॅनेजरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 12:27 PM

ऐश्वर्या राय-बच्चनच्या मॅनेजरने धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबई- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या #metoo कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे.  #metoo हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना उघड केल्या. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने नुकतीच सिडनीमध्ये एका ब्रॅण्ड प्रमोशनला हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्या राय-बच्चनच्या मॅनेजरने धक्कादायक खुलासा केला आहे. हॉलिवूडला निर्माता-दिग्दर्शक वाइनस्टीनची ऐश्वर्या राय-बच्चनवर वाईट नजर होती, असं ऐश्वर्याच्या मॅनेजरने सांगितलं.  हॉलिवूडचा निर्माता हार्वे-वाइनस्टीनवर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. यावर ऐश्वर्या रायनेही उत्तर दिलं आहे. ऐश्वर्याने म्हंटलं की,  #metoo कॅम्पेनच्या माध्यमातून प्रत्येकाने आयुष्यातील अनुभव कथन केला. महिलांबरोबर पुरूषही यामाध्यमातून अनुभव सांगत होते. त्यामुळे अशा विषयावर बोललं जातंय हे विशेष असल्याचं तिने म्हंटलं. 

ऐश्वर्याच्या मॅनेजरने पुढे सांगितलं की, हार्वेबरोबर काम करत असताना ऐश्वर्या एकटी भेटावी यासाठी हार्वेने अनेक प्रयत्न केले. मीटिंगच्या दरम्यान अनेकदा मला बाहेरही जायला सांगितलं. पण मी बाहेर जाण्यात नकार दिला. एके दिवशी हार्वेच्या ऑफिसबाहेर पडल्यावर त्याने मला प्रश्न विचारला. ऐश्वर्याला एकटीला भेटण्यासाठी काय करावं लागेल? असं हार्वेने विचारलं होतं. मी आणि ऐश्वर्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर त्याने कोल्डड्रिंक व थँक्यू मेसेज पाठवला होता, असं त्याने सांगितलं. 

हॉलिवूडचा निर्माता हार्वे वाइनस्टीनवर मॉडेल-अभिनेत्री नतासिया मॅल्थेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हॉलिवूडमधील इतरही काही अभिनेत्रींनी हार्वेवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. यानंतर सोशल मीडियावर  #metoo कॅम्पेनची सुरूवात झाली. हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर इतर तरूण-तरूणींनीही त्यांना आलेले वाईट अनुभव सांगितले.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसोशल मीडिया