Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयना का बायना हिंदीत!

By admin | Updated: November 2, 2014 00:51 IST

आयना का बायना हा मराठी सिनेमा हिंदी भाषेत डब करण्यात आला असून तो आता हिंदीतून दाखवण्यात येणार आहे. सोनी मॅक्स या वाहिनीने त्याचे अधिकार विकत घेतले आहे.

आयना का बायना हा मराठी सिनेमा हिंदी भाषेत डब करण्यात आला असून तो आता हिंदीतून दाखवण्यात येणार आहे. सोनी मॅक्स या वाहिनीने त्याचे अधिकार विकत घेतले आहे. या एका निर्णयामुळे आता अनेक असे चित्रपट डब करून दाखविले जाणार आहेत. आयना का बायना सिनेमा उत्तम कथा, सिनेमाची योग्य मांडणी, आणि अप्रतिम नृत्याविष्कार यामुळे चालला होता. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेरसिकांना बालसुधारगृहातील एका वेगळ्या विश्वाची ओळख या सिनेमाने करून दिली. सचिन खेडेकर आणि अभिनेत्नी अमृता खानविलकर यांनी या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली होती. या सिनेमाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय चित्नपट महोत्सवांतही आपली मोहोर उमटवली. आयना का बायना सिनेमाची लोकांकडून होत असलेली प्रशंसा लक्षात घेऊन हा सिनेमा संपूर्ण देशभरात पोहचविण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांनी हा संपूर्ण सिनेमा सर्व कलाकारांच्या आवाजातच त्यांनी हिंदीत डब केला आहे.