Join us  

खतरों के खिलाडीचे विजेतेपद मिळाल्यानंतर पुनित पाठक करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 8:00 AM

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर आता पुनित काय करतोय हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. पुनीत नुकत्याच सुरू झालेल्या एका शो मध्ये एका नव्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे.

ठळक मुद्देखतरा खतरा खतरा या मालिकेच्या आगामी एपिसोड मध्ये पुनीत पाठक कॉमेडियन आणि प्रँकस्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तुफानी नृत्यासाठी फेमस असलेला पुनीत पाठक या शोमध्ये डान्स परफॉर्मन्स देखील देणार आहे.

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक स्टंट हे अतिशय भयानक होते. पण स्पर्धकांनी ते खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण केले. या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत शमिता शेट्टी, अली गोनी, आदित्य नारायण, पुनित पाठक, रिधिमा पंडीत यांनी मजल मारली. पण शेवटच्या दिवशी शमिता आणि अली यांना या कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले आणि अंतिम सामना पुनित, आदित्य आणि रिधिमा यांच्यात रंगला.

खतरों के खिलाडी ९ या कार्यक्रमातील फायनलचा स्टंट हा आतापर्यंतच्या सगळ्या स्टंटपेक्षा भयानक होता आणि विशेष म्हणजे हा स्टंट या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने स्वतः डिझाईन केला होता. या स्टंटमध्ये वेग आणि उंची यांचे कॉम्बिनेशन होते. या स्टंटमध्ये कार, ट्रक आणि हेलिकॉप्टर यांचा वापर करण्यात आला होता. हा स्टंट तिन्ही स्पर्धकांनी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. पण पुनितने हा स्टंट कमी वेळात करत या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले. 

खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर आता पुनित काय करतोय हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. पुनीत नुकत्याच सुरू झालेल्या एका शो मध्ये एका नव्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. खतरा खतरा खतरा या मालिकेच्या आगामी एपिसोड मध्ये पुनीत पाठक कॉमेडियन आणि प्रँकस्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तुफानी नृत्यासाठी फेमस असलेला पुनीत पाठक या शोमध्ये डान्स परफॉर्मन्स देखील देणार आहे. पुनित शो मध्ये सामील होणार म्हणून भारती सिंग, आदित्य नारायण सगळेच खूश आहेत तर हर्ष लिंबाचिया पुनीतवर प्रँक करणार आहे.  

या कार्यक्रमातील एंट्रीविषयी पुनीत जे पाठक सांगतो, “खतरों के खिलाडीच्या अर्जेंटिना मधील चित्रीकरणामुळे आम्ही सर्वजण एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहोत. आमच्यात मस्त केमिस्ट्री जुळून आली आहे आणि त्यामुळे कलर्सने खतरा खतरा खतरा मधून आमची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना दाखवण्याचे ठरवले आहे. मला सुरुवातीपासूनच या शो मध्ये यायचे होते. पण माझे चित्रीकरण लंडन मध्ये सुरू असल्यामुळे ते जमले नाही. पण मी परत आल्याबरोबर लगेचच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. मला या शोची संकल्पना आवडली असून कॉमेडी हा प्रकार सर्वांनाच आवडतो. माझ्या चाहत्यांना माझा हा नवा अवतार नक्की आवडेल अशी मला आशा आहे. "

 

टॅग्स :पुनित पाठक