बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान (Kamaal R. Khan) अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरकेने ट्वीट केले आणि त्यावरून वाद झाला नाही, असे अभावानेच घडते. काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत (Manoj Bajpayee ) ‘पंगा’ घेतला होता. आता हा ‘पंगा’ केआरकेला महागात पडला आहे. होय, मनोज वाजपेयीने मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मनोज वाजपेयीचे वकील परेश एस. जोशी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मनोज वाजपेयी यांच्यावतीने केआरकेविरोधात एका आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केआरके (KRK) विरोधात कमल 500 अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती यात केली आहे. 26जुलैला मनोज विरोधात केआरकेने अपमानास्पद ट्वीट केले. यामुळे इंदौरमधील चाहत्यांमध्ये मनोज वाजपेयीची खराब झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.
केआरकेला ‘ते’ ट्वीट पडलं महागात, मनोज वाजपेयीनं ठोकला मानहानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:54 IST
काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत ‘पंगा’ घेतला होता. आता हा ‘पंगा’ केआरकेला महागात पडला आहे.
केआरकेला ‘ते’ ट्वीट पडलं महागात, मनोज वाजपेयीनं ठोकला मानहानीचा दावा
ठळक मुद्देयाआधी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने केआरके विरोधात तक्रार दाखल केली होती.