Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 18:17 IST

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मुलासोबतचा फोटो शेअर केला असून त्यासोबत माय लव्ह असे लिहिले आहे.

ठळक मुद्देपूनमने शेअर केलेल्या या फोटोत केवळ या मुलाचे अर्धे तोंडच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा मुलगा खरा कसा दिसतो, तसेच हा कोण आहे असे अनेक प्रश्न तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत.

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम चर्चेत आहेत. राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. आधी लग्नाची बातमी तिने नाकारली आणि नंतर होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली. तिच्या पतीचे नाव रितेश आहे, हेही तिने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी राखीने तिच्या हनिमुनचे फोटो शेअर केले. या फोटोत चुकून का होईना राखीच्या नवऱ्याची एक झलक दिसली होती आणि आता राखीनंतर पूनमने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मुलासोबतचा फोटो शेअर केला असून त्यासोबत माय लव्ह असे लिहिले आहे. या फोटोत केवळ या मुलाचे अर्धे तोंडच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा मुलगा खरा कसा दिसतो, तसेच हा कोण आहे असे अनेक प्रश्न तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत. पूनमचा हा प्रियकर कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मी़डियावर नेहमीच व्हायरल होतात. ती स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करताना दिसते. पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 28 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. पूनम पांडेने नशा या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सेक्सी अंदाजाची जास्त चर्चा रंगली होती. या चित्रपटाशिवाय ती शक्ती कपूरसोबत एका आयटम साँगवर थिरकली आहे. 

पूनम पांडे सुरुवातीच्या काळात तिच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. क्रिकेट मॅचेसची पूनम पांडे किती मोठी फॅन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे उतरवेन असे म्हणत 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्यावेळी पूनमने फुकटची पब्लिसिटी मिळवली होती. 

टॅग्स :पूनम पांडेराखी सावंत