Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूर बनला हिराणींचा ‘लकी चार्म’! ‘डिल’ पक्की!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:51 IST

 ‘संजू’नंतर रणबीरची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली. केवळ इतकेच नाही तर तो दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा ‘लकी चार्म’ही बनला. 

‘संजू’नंतर जणू रणबीर कपूरचे नशीबचं पालटले. या चित्रपटाने रणबीरला अभूतपूर्व यश मिळवून दिले. प्रेक्षकांपासून तर बॉलिवूडमधील बड्या बड्या दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. ‘संजू’नंतर रणबीरची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली. केवळ इतकेच नाही तर तो दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा ‘लकी चार्म’ही बनला. होय, बॉक्सआॅफिसवर ‘संजू’ने सुमारे ३४१ कोटी रूपये कमावले. साहजिकचं रणबीर सध्या राजकुमार यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे आणि त्याचमुळे रणबीरला कधीही दूर न करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. 

होय, रणबीर व राजकुमार हिराणी या दोघांत एक डिल फायनल झाली आहे. त्यानुसार, आता राजकुमार यांच्या प्रत्येक चित्रपटात रणबीर असेल. अर्थात प्रत्येक चित्रपटात तो हिरोचं असेल, असे गरजेचे नाही. पण अतिथी कलाकार म्हणा किंवा सहकलाकार म्हणा अशा भूमिकेत तो राजकुमार हिराणींसोबत असेंलचं असेल.लवकरच हिराणींच्या ‘मुन्नाभाई सीरिज’मध्ये रणबीर कॅमिओ करताना दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या पार्टमध्ये रणबीर सर्किटच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही़ कारण अद्याप याबाबतची घोषणा झालेली नाही.

रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ बॉलिवूड बॉक्सआॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपटबनला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटी कमावून विक्रम रचला. अद्यापही या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड सुरूच आहे.

टॅग्स :रणबीर कपूर