Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाच्या चमचमत्या ड्रेसनं वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष, ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:12 IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच एका इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी आलियाच्या लूकपेक्षा तिच्या ड्रेसच्या किंमतीची जास्त चर्चा होते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच एका इव्हेंटमध्ये दिसली होती. या इव्हेंटनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. विशेष बाब ही आहे की या फोटोतील आलियाच्या लूकपेक्षा तिच्या ड्रेसच्या किंमतीची जास्त चर्चा होते आहे.

आलियाने या इव्हेंटमध्ये सिल्व्हर रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये आलिया खूप सुंदर दिसत आहे. आलियाचा हा ड्रेस मायकल कॉस्ट्लोने डिझाईन केला आहे. मायकल कॉस्ट्लोच्या ऑनलाईन साईटनुसार या ड्रेसची किंमत ५५०० डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार या ड्रेसची किंमत ३,९०, ४२५ रुपये इतकी आहे.

आलियाने अशाप्रकारचा ड्रेस परिधान करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील तिने काही इव्हेंटमध्ये महागडा ड्रेस परिधान केलेला आहे. २०१७ साली आयफा पुरस्कारादरम्यान आलियाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. हा गाऊन डिझायनर जुहैर मुरादनं डिझाईन केला होता. या ड्रेसची किंमत २३ लाख रुपये होती. 

आलियाशिवाय नुकतीच बॉलिवूडची बेबो करीना नेकलेसमुळे चर्चेत आली होती. डान्स इंडिया डान्स सीझन ७ची परिक्षक करीना कपूर असून या शोमध्ये प्रियंकाने तिचा आगामी चित्रपट  'द स्काई इज पिंक'चं प्रमोशन करण्यासाठी आली होती. त्यावेळी करीनाच्या ड्रेसपेक्षा जास्त तिचा नेकलेस चर्चेत आला होता.

स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार, करीना कपूरच्या या नेकलेसची किंमत ३८ लाख रुपये आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर