Join us  

शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क

By जयदीप दाभोळकर | Published: January 03, 2021 12:22 PM

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापासून शिवसेनेत प्रवेशापर्यंत अशा अनेक गोष्टींमुळे उर्मिला मातोंडकर चर्चेत राहिल्या.

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी केला होता शिवसेनेत प्रवेश

अभिनयानंतर राजकारणार प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांची २०२० या वर्षांत खुप चर्चा झाली. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापासून शिवसेनेत प्रवेशापर्यंत अशा अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या. शिवसेनेत प्रवेस केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांतच आपल्या कार्यालयासाठी नवी जागा खरेदी केली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी २०२० या वर्षाच्या अखेरिस आपल्या नव्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली. त्यांचं हे नवं कार्यालय १ हजार चौरस फूटांमध्ये पसरलं आहे. त्यांचं हे कार्यालय खार पश्चिम परिसरातील लिकींग रोड परिसरात आहे. मुंबई मिररनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे. त्यांनी लिकींग रोडवरील दुर्गा चेंबर्स या इमारतीत सहाव्या मजल्यावर ३ कोटी ७५ लाख रूपयांना हे ऑफिस खरेदी केलं आहे. या इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरांसाठी असून वरील मजल्यांसाठी दरमहा ५ ते ८ लाक रूपय इतकं भाडं आकारलं जातं. ३६ हजार रूपये प्रति चौरफ फूट या दरानं उर्मिला मातोंडकर यांनी कार्यालयाची जागा खरेदी केली आहे. २८ डिसेंबर रोजी राजेश कुमार या व्यावसायिकाकडून त्यांनी ही जागा खरेदी केली असून उर्मिला मातोंडकर यांनी याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पदासाठी शिवसेनेत प्रवेश नाहीविधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लोकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून ट्वीट करणारा नेता बनायची माझी इच्छा नाही, अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आगामी काळात लोकांमध्ये राहून राजकारण करणार असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरशिवसेनाकाँग्रेस