Join us

लेकीच्या लग्नानंतर आमिर खान एक्स पत्नी किरण रावसोबत व्हॅकेशन करतोय एन्जॉय, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 18:59 IST

आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याची मुलगी आयरा खान(Ira Khan)च्या लग्नात धमालमस्ती करताना दिसला. आता मुलीच्या लग्नानंतर आमिर खान त्याची माजी पत्नी किरण राव (Kiran Rao)आणि मुलगा आझाद राव(Aazad Rao)सोबत सुट्टीवर गेला आहे.

आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याची मुलगी आयरा खान(Ira Khan)च्या लग्नात धमालमस्ती करताना दिसला. आता मुलीच्या लग्नानंतर आमिर खान त्याची माजी पत्नी किरण राव (Kiran Rao)आणि मुलगा आझाद राव(Aazad Rao)सोबत सुट्टीवर गेला आहे. किरण रावने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आमिर खान त्याचा मुलगा आझादसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

किरण रावने नुकतेच इन्स्टाग्रामवर अकाउंटवर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात आमिर खान आणि किरण राव यांच्यासोबत त्यांचा मुलगा आझादही मस्तीच्या मूडमध्ये दिसतो आहे. आमिर खानने त्याच्या कुत्र्यालाही सोबत नेले. या फोटोंमध्ये आमिर खान आणि त्याचा कुत्राही दिसत आहे.

२०२१मध्ये किरण राव आणि आमिर खान झाले विभक्तआमिर खान आणि किरण राव यांचा ३ वर्षांपूर्वी २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता. दोघांनी जवळपास १५ वर्षे एकत्र संसार केला. यानंतर दोघेही वेगळे झाले. आमिर खान आपल्या रिलेशनशिपबद्दल सतत चर्चेत असतो. आमिर खानचे दुसरे लग्न किरण रावशी झाले होते. घटस्फोटानंतरही आमिर खान आणि किरण राव चांगले मित्र आहेत आणि अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. किरण रावही आमिर खानची मुलगी आयरा हिच्या लग्नात पाहुणी म्हणून हजर होती. घटस्फोटानंतरही आमिर खानची त्याच्या माजी पत्नींशी मैत्री कायम आहे. आमिर खानच्या दोन माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव या अनेकदा एकत्र दिसतात.

टॅग्स :आमिर खानकिरण राव